शनिवार, 25 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified: शनिवार, 10 नोव्हेंबर 2018 (10:14 IST)

माझ्या घटस्फोटाला कुटुंबीयांनी पाठिंबा द्यावा : तेज प्रताप यादव

राष्ट्रीय जनता दल पक्षाचे अध्यक्ष लालू प्रसाद यादव यांचा मुलगा माजी मंत्री तेज प्रताप यादव यांनी घटस्फोटाचा अर्ज केल्यापासून त्यांनी घर सोडले आहे. सध्या ते हरिद्वार येथे राहत असून जोपर्यंत कुटुंबीय माझ्या घटस्फोटाला पाठिंबा देत नाहीत, तोपर्यंत घरी येणार नाही, अशी भूमिका त्यांनी घेतली आहे.
 
पटना येथील स्थानिक वृत्तवाहिनीशी बोलताना तेज प्रताप यांनी छोटा भाऊ तेजस्वी यादवला त्याच्या वाढदिवसानिमित्त शुभेच्छा दिल्या. “कदाचित तेजस्वी बिहारचा पुढचा मुख्यमंत्री बनेल. मी नेहमीच त्याच्या बाजुने त्याला मदत करण्यासाठी असेल. जसे महाभारतात कृष्ण अर्जुनाची मदत करत होता.”नवी दिल्ली येथे होणाऱ्या वाढदिवसाच्या कार्यक्रमाला मला हजेरी लावता येणार नाही, असेही तेज प्रताप यावेळी म्हणाले. काही दिवसांपूर्वी तेज प्रताप बोध गया येथे शेवटचे दिसले होते.