हे कस काय घडल, गुगल मॅपमुळे घटस्फोट
पेरू देशात गुगल मॅपमुळे घटस्फोट झाला आहे. एक व्यक्ती गुगल मॅपद्वारे रस्ता शोधत होता. त्याचदरम्यान मॅपवर एक महिला निर्दशनास आली. त्याला ती महिला हुबेहुब त्याच्या पत्नीसारखी भासली असता त्याने मॅप झुम करून पाहिले. तर ती महिला अन्य कोणी नसुन त्याची पत्नीच होती. त्या व्यक्तीला केवळ पत्नी दिसली नसुन तिच्यासोबत अज्ञात पुरूष देखील पाहायला मिळाला. त्या दोघांच्या हालचालीवरून त्या दोघांमध्ये प्रेमसंबंध असल्याचा संशय आला.
घरी गेल्यानंतर पत्नीला यासंदर्भात विचारले असता, तिने ती गोष्ट नाकारली. त्यावेळी पतीने त्या दोघांचा फोटो दाखवला असता त्यावेळी तिने दोघांमध्ये प्रेमसंबंध असल्याची कबुली दिली. पतीने सोशलमिडीयावर मॅपवरील फोटो आणि पत्नीचा फोटो शेअर करत त्याने पत्नीला घटस्फोट दिला.