मंगळवार, 24 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. आज-काल
  3. मंथन
Written By
Last Modified: शुक्रवार, 12 ऑक्टोबर 2018 (14:55 IST)

प्लुटोवरील बर्फाची पठारे

प्लुटो ग्रहाच्या संशोधनासाठी नासाने न्यू होराझन्स हे अंतराळ यान पाठवले असून त्याने या रहस्य  ग्रहाची अनेक रहस्ये आतापर्यंत उलगडली आहेत. आताही त्याने आपली कामगिरी चोख बजावत प्लुटोची आणखी काही छायाचित्रे नासाने नुकतीच प्रसिद्ध केली. ती प्लुटोच्या उत्तरेकडील भागाची आहेत. या ग्रहावर लांबच लांब पठारे असल्याचे त्यावरून स्पष्ट होते. या नव्या संशोधनानंतर या दर्‍या खोर्‍यांना 'लॉवेल रेजिओ' असे नाव देण्यात आले आहे.
 
प्लुटोच्या मोहिमिचे प्रमुख असलेल्या 'पर्सिव्हल लॉवेल' यांच्या नावावरून या दर्‍याखोर्‍यांना 'लॉवेल रेजिओ' असे नाव देण्यात आले आहे. या पठारापैकी सर्वात मोठे पठार 45 मैल (75 कि.मी.) इतके रूंद आहे. या पठारामध्येच एक पठार 6 मैल (10 कि. मी.) पसरले आहे.
 
नासाच अंतराळ यानाने या पठरांच्या भिंती तपासून पाहिल्या असून ही पठारे खूप पुरातन म्हणजे प्लुटोच्या निर्मितीपासून असावीत, असा त्यांचा अंदाज आहे. बर्फाची ही पठारे काहीशी ठिसूळ असली तरी ती प्लुटोच्या पुरातन भूविवर्तनाचा ती उत्तम नमुना ठरतील, असे नासाचे मत आहे.
 
या पठारावर वादळी वार्‍याचे साम्राज्य असून पठाराखाली असलेला भूप्रदेश एका विशिष्ट पदार्थाने आच्छादला गेल्याने वार्‍याचा परिणाम तेथे फारसा जाणवत नाही. अंतराळ यानाने पाठवलेल्या छायाचित्रात लाल रंगात 45 मैलाचा भला मोठा भूप्रदेश दिसत असून त्याच्या जवळच किमान अडीच मैलांचा (4 कि. मी.) भूभाग खोलवर आहे. ही सर्व पठारे बर्फाची असावीत, असा दाट संशय नासाला आहे. 
 
बर्फाळ पठारांचा काही भाग कोसळून दर्‍या तयार झाल्या असावत, असाही निष्कर्ष नासाच्या संशोधकांनी छायाचित्रांचे विश्लेषण केल्यानंतर काढला आहे. या पठरामध्ये पार्‍यासारखा दिसणारा भूप्रदेशही छायाचित्रामध्ये ठळकपणे पिवळ्या रंगात दाखवण्यात आला असून तसा भूभाग प्लुटोवर अन्यत्र कुठेही नाही. नासाच्या न्यू होराझन्स यानाने आपल्याकडील इन्फ्रारेड किरणांनी प्लुटोवरील बर्फामध्ये मिथेन   असल्याचेही नमूद केले आहे. काही ठिकाणी या यानाला नायट्रोजन बर्फही आढळला आहे. या पठारांच्या छायाचित्रामध्ये काही भाग धुरकट दिसत आहे. तिथे पठारांवर जुना मिथेनयुक्त बर्फ असल्याने सूर्यकिरणामुळे तो भाग अस्पष्ट दिसत असावा.
 
म.अ. खाडिलकर