सोमवार, 6 फेब्रुवारी 2023
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By

तीन तलाक विधेयकाला हिवाळी अधिवेशनाचा मुहूर्त

तीन तलाकशी संबंधित दुरुस्ती विधेयक  आता हिवाळी अधिवेशनापर्यंत पुढे ढकलले गेले आहे. त्यामुळे सरकार विधेयकाबाबत वटहुकूम काढण्याच्या विचारात आहे. 

राफेल सौद्याच्या चौकशीवरून गदारोळ झाल्याने दुपारी अडीच वाजेपर्यंत कामकाज तहकूब झाले. यानंतर हे विधेयक मंजूर करण्यासाठी अधिवेशनाचे कामकाज एका दिवसाने वाढवण्याची चर्चा होती. मात्र कामकाज सुरू झाल्यानंतर सभापती व्यंकय्या नायडूंनी तीन तलाक विधेयक मंजूर करण्याबाबत सर्व पक्षांची सहमती नसल्याने ते हिवाळी अधिवेशनात मंजुरीसाठी मांडले जाईल, अशी घोषणा केली.