1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. लोकप्रिय
Written By
Last Modified: शुक्रवार, 8 जून 2018 (16:02 IST)

'हे' घटस्फोटासाठी वैध कारण ठरते

valid reason for divorce
एका महिलेने दाखल केलेल्या याचिकेवर सुनावणी करतांना पती -पत्नींमध्ये जबरदस्तीचे किंवा अनैसर्गिक शरीरसंबंध असणं, हे घटस्फोटासाठी वैध कारण असू शकतं असा निर्णय पंजाब आणि हरियाणा उच्च न्यायालयाने दिला आहे.
 
याचिकाकर्ती महिला नवऱ्यापासून वेगळी राहते. तिचा विवाह २००७मध्ये झाला होता. लग्नाच्या वेळी तिच्या सासरच्या मंडळींनी हुंडाही घेतला होता. लग्न जमवत असताना नवरा मुलगा एका खासगी कंपनीत इंजिनिअर म्हणून कार्यरत असल्याचं सांगितलं गेलं. मात्र लग्न झाल्यानंतर हुंडा कमी देण्यावरून तिला सासरचे मारहाण करत असत. तसंच नवरा दारुडा असून दारू प्यायल्यानंतर तो आपल्याशी संमतीशिवाय आणि अनैसर्गिकरित्या शरीरसंबंध ठेवत असे.
 
या छळाला कंटाळून महिलेने कोर्टात धाव घेतली होती आणि नवऱ्याविरुद्ध जबरदस्तीने आणि अनैसर्गिक शरीरसंबंध ठेवल्याचा आरोप केला होता. मात्र, सत्र न्यायालयाने चार वर्षांपूर्वी महिलेची याचिका रद्द केली होती.