फेसबुकने मानले, सॉफ्टवेयरमध्ये झालेल्या गडबडीमुळे 1.4 कोटी यूजर्सचा डाटा झाला सार्वजनिक
फेसबुकने गुरुवारी सॉफ्टवेअरमध्ये गोंधळ झाल्याचे मान्य केले आहे. कंपनीनं दिलेल्या माहितीनुसार, या गोंधळामुळे 14 मिलियन युजर्सचा खासगी डेटा सार्वजनिक झाला होता. याबाबत फेसबुकनं माफीदेखील मागितली आहे. 18 मे ते 27 मे या कालावधीदरम्यान हा गोंधळ झाल्याची माहिती समोर आली आहे. याआधी फेसबुकवरील युजर्सची खासगी माहिती केंब्रिज अॅनालिटिका कंपनीनं चोरल्याचे प्रकरण ताजे आहे. त्यानंतर सदरचा आणखी एक नवीन गंभीर प्रकार समोर आला आहे.