मारुतीची 'झेन' गाडी परत येणार
मारुती कंपनीची झेन ही कार सर्वाधिक विक्री होणाऱ्या कारपैकी एक कार आहे. या गाडीची Resale व्हॅल्यूही खूप आहे. काही वर्षांपूर्वी कंपनीने या कारचं प्रोडक्शन बंद केलं होतं. मात्र, आता पून्हा एकदा लॉन्च करण्यात येणार आहे आणि कंपनीचा हा प्रयोग यशस्वी ठरु शकतो. कारण, 2002 साली बलेनो बंद केल्यानंतर मारुतीने प्रीमिअर हेचॅक सेग्मेंटमध्ये बलेनो (Baleno)पून्हा लॉन्च केली आहे. फायनान्शिअल एक्सप्रेसमध्ये प्रकाशित वृत्तानुसार, मारुती कंपनी बाजारात आपलं वर्चस्व कायम ठेवण्यासाठी अनेक प्रोडक्टवर काम करत आहे. आर्थिक वर्ष 2020-21 मध्ये नवी कॉम्पॅक्ट एसयूव्ही कार लॉन्च करण्याचा कंपनीचा विचार आहे. त्यातच अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे की, कंपनी आपल्या आवडत्या झेन ब्रँडसोबत पुनरागमन करेल.