भारताचा जीडीपी 7.3 टक्क्यांनी वाढणार
भारताच्या जीडीपी वाढीच्या अंदाजाध्ये घट करण्यात आल्याचे 'मूडी'ज रेटिंग या जागतिक स्तरावरील पतनिर्धारण संस्थेने म्हटले आहे. या वर्षी भारताची अर्थव्यवस्था 7.5 टक्क्यांच्या दराने वाढेल असा अंदाज आधी वर्तवण्यात आला होता. मात्र, यात कपात करताना भारताची अर्थव्यवस्था 7.3 टक्क्यांनी वाढेल असा सुधारित अंदाज 'मूडी'जने वर्तवला आहे.
यामुळे निवडणुकीच्या वर्षाआधी मोदी सरकारला याचा फटका बसेल अशी शक्यता आहे.
विशेष म्हणजे खनिज तेलाच्या वाढलेल्या किमतींमुळे अर्थव्यवस्थेला फटका बसणार असल्याचे 'मूडी'जने म्हटले आहे. अर्थात 2019 मध्ये मात्र भारताची अर्थव्यवस्था 7.5 टक्क्यांच्या दरानेच वाढेल असा अंदाज मात्र कायम ठेवला आहे.