शनिवार, 11 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. आंतरराष्ट्रीय
Written By

चौथ्या मजल्यावर लटकत होता मुलगा, स्पायडरमॅन सारखं 30 सेकंदात वाचवला जीव (व्हिडिओ)

फ्रान्सची राजधानी पॅरिस येथे एका धक्कादायक घटनेत चार मजली इमारतीवर एक मुलगा लटकत होता. तेव्हाच माली रहिवासी माकोउदोऊ गसामा यांनी केवळ 30 सेकंदात मुलाची एखाद्या सिनेमातील नायकाप्रमाणे जीव वाचवला. गसामा यांचे पराक्रम बघून सर्व हैराण झाले.
 
22 वर्षीय माकोउदोऊ एका अपार्टमेंटजवळून जात असताना त्यांनी बघितले की अपार्टमेंटच्या बाल्कनीत एक मुलगा लटकत आहे. हे बघून ते लगेच बिल्डिंगवर चढले आणि मुलाचा जीव वाचवला.
 
सोशल मीडियावर हा व्हिडिओ व्हायरल होत आहे. व्हिडिओत मामौदो यांनी असाधारण प्रकारे चपळाईने एक ते दुसर्‍या बाल्कनी चढत मुलाला पडण्यापासून वाचवले. येथील लोकांसाठी तो स्पायडरमॅन झाला.
 
सूत्रांप्रमाणे व्हिडिओ व्हायरल झाल्यावर फ्रान्स प्रेसिडेंट इमॅन्युएल मॅक्रो यांनी गसामा यांना बोलावून म्हटले की पराक्रमासाठी माली प्रवाशाला आता फ्रेंच नागरिक बनविले जाईल.