सोमवार, 27 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. अर्थजगत
  3. वाणिज्य वृत्त
Written By
Last Modified: मुंबई , रविवार, 27 मे 2018 (12:32 IST)

मोदी कालावधीत गुंतवणूकदार 72 लाख कोटींनी श्रीमंत

भाजपप्रणीत लोकशाही आघाडी सरकारच्या चार वर्षांच्या कालावधीत सेन्सेक्स 41 टक्क्यांनी झेपावला आहे, तर मोदी सरकारच्या कालावधीत गुंतवणूकदारांची मालमत्ता 72 लाख कोटी रुपयांनी वाढली आहे.
 
मोदी सरकार सत्तेत येऊन चार वर्षे झाले आहे. या दरम्यान, मुंबई शेअर बाजाराचा सेन्सेक्स 10,207.99 अंशांनी झेपावला आहे. टक्केवारीत ही वाढ 41.29 आहे. मुंबई शेअर बाजारातील सूचिबद्ध कंपन्यांचे मूल्य गेल्या चार वर्षांत 75 लाख कोटी रुपयांवरून 147 लाख कोटी रुपयांवर पोहोचले आहे. मुंबई निर्देशांकाने 29 जानेवारी 2018 रोजी 36,443.98 हा ऐतिहासिक टप्पा गाठला होता. दरम्यान, सेन्सेक्सने सलग दुसर्‍या सत्रात निर्देशांक वाढ नोंदविताना 35 हजारानजीकचा स्तर राखला, तर निफ्टीही 10,600 पुढे गेला. सप्ताहअखेरच्या व्यवहारातील निर्देशांक तेजीमुळे टाटा सूहातील टीसीएस ही कंपनी सर्वाधिक, 7 लाख कोटी रुपयांचे बाजार भांडवल कविणारी कंपनी ठरली.