बुधवार, 25 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: मुंबई , गुरूवार, 24 मे 2018 (16:55 IST)

विधानपरिषदेच्या चार जागांसाठी येत्या २५ जून रोजी मतदान

मुंबई पदवीधर, मुंबई शिक्षक, नाशिक विभाग शिक्षक आणि कोकण विभाग पदवीधर मतदार संघातून विधानपरिषदेवर निवडून द्यावयाच्या चार जागांसाठी येत्या २५ जून रोजी निवडणूक होत असून, केंद्रिय निवडणूक आयोगाने आज या निवडणूकांचा कार्यक्रम जाहीर केला आहे.
 
केंद्रिय निवडणूक आयोगाने यापूर्वी या निवडणूका पुढे ढकलल्या होत्या. आज नव्याने निवडणूक कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे.मुंबई विभाग पदवीधर मतदार संघातून शिवसेनेचे डाॅ.दिपक सावंत, मुंबई विभाग शिक्षक मतदार संघातून जनता दल युनायटेडचे कपिल पाटील, कोकण विभाग पदवीधर मतदार संघातून राष्ट्रवादीचे निरंजन डावखरे, तर नाशिक विभाग शिक्षक मतदार संघातून अपक्ष डाॅ अपूर्व प्रशांत हिरे यांची मुदत येत्या ७ जुलै रोजी संपत असून,या निवृत्त होत असलेल्या चार जागांसाठी येत्या २५ जून रोजी मतदान घेण्यात येणार आहे.केंद्रिय निवडणूक आयोगाने आज या निवडणूक कार्यक्रमाची घोषणा केली आहे.
 
या निवडणूकीसाठी ३१ मे रोजी अधिसूचना जारी करण्यात येणार असून,७ जून उमेदवारी अर्ज दाखल करण्याची शेवटची तारीख आहे.८ जून रोजी उमेदवारी अर्जांची छाननी करण्यात येणार आहे.११ जून उमेदवारी अर्ज मागे घेण्याची शेवटची मुदत आहे. या चार जागांसाठी २५ जून रोजी सकाळी ८ ते दुपारी ४ वाजेपर्यंत मतदान घेण्यात येवून २८ जून रोजी मत मोजणी होईल.