शनिवार, 11 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified: मंगळवार, 22 मे 2018 (14:54 IST)

कर्नाटक येथील निवडणुकीवर राज यांचे जबरदस्त कार्टून

मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी भाजपावर जोरदार तिखट अशी टीका केली आहे. त्यांनी एक व्यंगचित्र आपल्या अधिकृत फेसबुक पेजवर शेअर केले आहेत. मागील आठवड्याभरापासून कर्नाटकात सुरू असलेल्या राजकीय नाट्यावर भाष्य करणारे व्यंगचित्र राज ठाकरे यांनी काढले आहे. या व्यंगचित्रद्वारे राज ठाकरे यांनी भाजपावर जोरदार टीका केली आहे. या चित्रात काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांचा हात भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अध्यक्ष अमित शाह यांच्या घशात दाखवण्यात आला आहे. अमित शाह जमिनीवर बसलेले आहेत व राहुल गांधींच्या शेजारी जनता दलाचे (सेक्युलर) नेते एच.डी. कुमारस्वामी उभे असलेले दिसत आहेत. एकूणच त्यांच्या पेजवर या चित्रासाठी मोठया प्रमाणात लाईक मिळत आहेत.