मंगळवार, 28 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By

कर्नाटक विजयात योगींची साथ, मोदींनंतर सर्वात प्रभावी प्रचारक

नरेंद्र मोदी यांच्यानंतर भाजपला एक आणखी असा नेता लाभला आहे ज्यांचा प्रभाव केवळ प्रदेशात नव्हे तर देशातील अनेक राज्यांमध्ये दिसून येत आहे. हे नाव आहे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ.
 
भाजप स्टार प्रचारक या रूपात योगी यांनी कर्नाटकात पक्षासाठी अनेक सभा आणि रोड शो केले. योगींनी ज्या 33 विधानसभा जागांवर प्रचार केला होता तिथे भाजप आघाडीवर दिसली. उल्लेखनीय आहे की त्रिपुरा येथे ही योगी यांच्या प्रभाव दिसून आला होता. ज्या जागांसाठी त्यांनी प्रचार केला होता तेथील भाजप उमेदवार जिंकले होते.
 
योगी यांनी हिंदू कार्ड वापरून कर्नाटकाच्या नाथ संप्रदायाशी जुळलेल्या प्रसिद्ध मंजुनाथ पिठाचा दौरा केला होता. येथे योगींच्या अपीलचा प्रभाव दिसून आला आणि नाथ संप्रदाय व मठ समर्थकांनी भाजपचा साथ दिला.
 
दोन्ही निवडणुकींचे परिणाम बघत हे स्पष्ट दिसून येत आहे की योगींना हिंदू संत, संन्यासी, आणि त्यांच्याशी जुळलेल्या लोकांचे समर्थन मिळत आहे. येणार्‍या विधानसभा निवडणुकीत देखील योगींना स्टार प्रचारक म्हणून आमंत्रित केले जाईल आणि त्यांचा प्रभाव कायम राहिला तर त्यांना मोदींचा पर्याय म्हणून पाहिले जाऊ शकतं.