शनिवार, 23 नोव्हेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified: शनिवार, 26 मे 2018 (17:30 IST)

फसवणूक करणारे, हुकुमशाही सरकार आता टिकणार नाही मोदींवर राज यांची टीका

एक माणूस खोटे बोलून देशाला फसवतो, हे आता लोक खपवून घेणार नाहीत, देशातील हुकूमशाही सात-आठ महिन्यात संपेल, अशा शब्दांत मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीका केली आहे. चिपळून येथील पत्रकार परिषदेत ते बोलत होते.राज ठाकरे यांनी सरकारवर  जोरदार टीका केली आहे.
राज यावेळी म्हणाले की , कोकणाचा विकास या सरकारला नको दिसत आहे, जेथे मासे नाहीत तेथे  कोकणच्या किनारपट्टीला आवश्यक असलेले मत्स्य विज्ञान महाविद्यालय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस नागपूरला घेवून चालेले आहे. सर्व योजना विदर्भाला नेऊन पुन्हा फडणवीस व मुनगंटीवार स्वतंत्र विदर्भाच्या घोषणा देत आहेत. या दुटप्पीपणाचे परिणाम येत्या निवडणुकीत भोगावे लागतील. शेवटी मोदी या एकाच नावावर लोकांना किती दिवस फसवणार, अशी जहरी टीका मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केली आहे.

राज यांनी पालघरमध्ये झालेल्या जाहीर सभेत  भैय्ये लोकांच्या मतांसाठी भाजप नेत्यांनी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री आदित्यनाथांना बोलावले. शेवटी मोदी एकच नाव वापरून व खोट बोलून किती दिवस चालणार.
जागा वाढवण्यासाठी भाजपवाले दंगली घडवून आणतील. पण गुजरातमध्ये पैसा व सत्ता असून काय झाले हे उदाहरण समोर आहेच. त्यामुळे आता जनता हुशार झाली असून, हे सरकार पुढे उभे राहणार नाही असे चित्र आहे. त्यामुळे आता काही दिवसात हे सरकार उलतले जाणारा असेही राज यांनी सागितले आहे.