GoAir धमाकेदार ऑफर, आता 1299 मध्ये हवाई प्रवास
बजेट एअरलाईन गोएअरने मान्सून सेल अंतर्गत धमाकेदार ऑफर देत 1299 रुपये सुरुवाती भाड्यात हवाई सेवेची घोषणा केली आहे. तीन दिवसीय या ऑफर अंतर्गत आपण 6 जून पर्यंत आपलं तिकिट बुक करवून 24 जून ते 30 सप्टेंबर पर्यंत प्रवास करु शकतात.
ऑफरमध्ये कर आणि शुल्कासह 1299 रुपयात उडण्याची संधी मिळणार आहे. फ्लाईट तिकिटाची बुकिंग नॉन रिफंडेबल असेल. तसेच यात सामील टॅक्स आणि फीस रिफंडेबल असेल.
तसेच रूट, फ्लाईट आणि टाइमिंग प्रमाणे भाड्यात बदल होऊ शकतं. तिकिट बुकिंग आधी या आधी मिळवा या आधारावर असणार आणि ऑफर प्राइस केवळ एकतर्फी भाड्यावर लागू असेल.
उल्लेखनीय आहे की गोएअर हल्ली 23 डेस्टिनेशंस साठी आठवड्यातून 1544 हून अधिक फ्लाईट्स ऑपरेट करतं.