बुधवार, 25 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. अर्थजगत
  3. वाणिज्य वृत्त
Written By
Last Modified: मुंबई , मंगळवार, 6 फेब्रुवारी 2018 (12:53 IST)

शेअर बाजारात 1200 अकांची मोठी घसरण

अमेरिकेच्या शेअर बाजारात सोमवारी मोठी घसरण नोंदवली होती. त्याचा परिणाम आज भारतीय शेअर बाजारावरही झाला. सेन्सेक्स जवळपास १२०० अंकांनी गडगडला. तर निफ्टीच्या सुरुवातीच्या व्यवहारात ३५० अंकांची घसरण नोंदवली.
 
अमेरिकी शेअर बाजारात ऑगस्ट २०११ नंतर नोंदवलेली सर्वात मोठी घसरण आहे. सोमवारी डाओ जोन्स ११७५.२ अंक म्हणजेच ४.६ टक्क्यांच्या घसरणीसह २४३४५.७५ वर बंद झाला. एस अँड पी ५०० भांडवली निर्देशांक ३.८ टक्के आणि नेस्डेक ३.७ टक्क्यांच्या घसरणीसह बंद झाला.