बुधवार, 25 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. अर्थजगत
  3. वाणिज्य वृत्त
Written By
Last Modified: बुधवार, 24 जानेवारी 2018 (15:32 IST)

'गो एअर' ची प्रजासत्ताक स्पेशल ऑफर

गो एअर एअरलाईननं प्रजासत्ताक स्पेशल ऑफर  जाहीर केलीय. ही ऑफर २४ जानेवारी ते २८ जानेवारीपर्यंत सुरू राहील. या ऑफरमध्ये १ मार्च ते ३१ डिसेंबर २०१८ पर्यंत तिकीट बुकिंग करता येईल. ही ऑफर सीमित कालावधीसाठी आहे.  

गो एअरनं घरगुती नेटवर्कसाठी ७२६ रुपयांच्या बेस फेअरमध्ये सर्वात स्वस्त ऑफर सादर केलीय. तर सर्वात महागडं तिकीट ३९२६ रुपयांमध्ये उपलब्ध होईल. तुम्ही जर गो एअरच्या वेबसाईटवरून (goair.in) तिकीट बुक केलंत तर २५०० रुपयांचे वाऊचर्सही तुम्हाला मिळतील.  गो एअर २३ घरगुती डेस्टिनेशनसाठी सर्व्हिस देते. प्रत्येक आठवड्याला या एअरलाईन्सच्या १५४४ फ्लाइटस् उड्डाण घेतात. 

यापूर्वी स्पाईसजेटनंही प्रजासत्ताक दिनासाठी 'ग्रेट रिपब्लिक डे सेल' जाहीर केलाय. स्पाईसजेटची घरगुती उड्डाणासाठी सर्वात स्वस्त तिकीट ७६९ रुपयांत बुक करता येतंय.