माजी भारतीय वेगवान गोलंदाज व्यंकटेश प्रसाद कर्नाटक राज्य क्रिकेट असोसिएशन (केएससीए) च्या निवडणुकीत भाग घेणार आहेत. या निवडणुका ऑक्टोबर ते नोव्हेंबर दरम्यान होण्याची शक्यता आहे. अनुभवी प्रशिक्षक, निवडकर्ता आणि प्रशासक असलेले 56 वर्षीय प्रसाद 2013 ते 2016 पर्यंत केएससीएचे उपाध्यक्ष होते.
त्यावेळी अनिल कुंबळे केएससीएचे अध्यक्ष होते. परंतु तेव्हापासून प्रसादने प्रशासकीय कामापासून स्वतःला दूर केले आहे आणि कोचिंग कारकिर्दीवर लक्ष केंद्रित केले आहे आणि मीडिया जगात क्रिकेट तज्ज्ञ म्हणूनही काम केले आहे.
प्रसाद हे भारतीय संघाचे गोलंदाजी प्रशिक्षकही राहिले आहेत. त्यांनी इंडियन प्रीमियर लीग फ्रँचायझी पंजाब किंग्ज (पूर्वीचे किंग्ज इलेव्हन पंजाब) सोबत प्रशिक्षक म्हणूनही काम केले आहे. प्रसाद यांच्या पॅनेलमध्ये अनुभवी प्रशासक विनय मृत्युंजय यांचाही समावेश असेल.
मृत्युंजय हे केएससीएचे माजी कोषाध्यक्ष आणि बीसीसीआयच्या वित्त समितीचे सदस्य आहेत. येत्या काही दिवसांत प्रसाद आणि मृत्युंजय त्यांच्या पॅनेलच्या पूर्ण सदस्यांची घोषणा करतील अशी माहिती आहे. रघुराम भट्ट यांच्या नेतृत्वाखालील केएससीए कार्यकारिणीचा कार्यकाळ 30 सप्टेंबर रोजी संपणार आहे.
Edited By - Priya Dixit