कांदिवलीमध्ये प्रियकराच्या छळाला कंटाळून 25 वर्षीय महिलेची आत्महत्या
मुंबईच्या कांदिवली परिसरात प्रियकराचा छळाला कंटाळून 25 वर्षीय महिलेने आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. या प्रकरणी कांदिवली पोलिसांनी 23 वर्षीय तरुणाला आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल केला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, दोघेही रिलेशनशिपमध्ये होते आणि महिलेच्या आईने आरोप केला आहे की आरोपी तिला त्रास देत होता. सततच्या छळाला कंटाळून तिने टोकाचे पाऊल घेतले. असे एफआयआरमध्ये म्हटले आहे. मयत तरुणी कांदिवली पश्चिम येथे आई सोबत राहायची. तरुणी एका सलूनमध्ये काम करायची तिची आई घरकाम करायची आरोपी त्याच परिसरात राहायचा. तरुणी आणि आरोपीचे प्रेम संबंध जुळले. तो तिच्याघरी वारंवार जायचा
21 नोव्हेंबर रोजी रात्री 9 वाजेच्या सुमारास तरुणी झोपलेली असता तिच्या आईने तिला जेवणासाठी उठवण्याचा प्रयत्न केला, पण तिने काहीच उत्तर दिले नाही. तिच्या आईने सांगितले की ती तणावात होती. आणि तिने काहीही खाल्ले नव्हते. दुसऱ्या दिवशी, तिची आई सकाळी 9 वाजताच्या सुमारास कामावर निघून गेली.
आई गेल्यावर आरोपी तरुणीच्या घरी आला. नंतर दोघांमध्ये वाद झाले असे शेजारच्या बाईने तरुणीच्या आईला सांगितले. आरोपी घरातून बाहेर पडला. थोड्या वेळाने आरोपी पुन्हा तरुणीचा घरी आला दरवाजा तोडून बघितल्यावर त्याला तरुणी तिच्या साडीने छताच्या पंख्याच्या हुकला गळफास घेतल्याचे आढळले. त्याने तिला खाली आणले आणि रुग्णवाहिकेची व्यवस्था केली. तिला ऑस्कर रुग्णालयात नेण्यात आले, जिथे डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले.
त्यानंतर तिच्या आईने आरोपी प्रियकराच्या विरुद्ध तक्रार दाखल केली. पोलिसांनी भारतीय दंड संहितेच्या (आयपीसी) कलम 108 (आत्महत्येस प्रवृत्त करणे) अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे.
Edited By - Priya Dixit