सोमवार, 27 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. मुंबई
Written By
Last Updated : सोमवार, 27 जानेवारी 2025 (15:28 IST)

दिल्लीनंतर मुंबईच्या कांदिवली परिसरातील इराणीवाडीच्या आंतरराष्ट्रीय शाळेला बॉम्बची धमकी

bomb threat
दिल्लीतील शाळांना बॉम्बस्फोटने उडवून देण्याच्या धमकी नंतर आता मुंबईतील शाळांना बॉम्ब स्फोट घडवून येण्याची धमकी देण्यात आली आहे. मुंबईतील कांदिवली परिसरातील इराणीवाडी येथील एका इंटरनेशनल स्कूलला बॉम्बची धमकी देण्याची ईमेल द्वारे देण्यात आली आहे. या मेलला गांभीर्याने लक्षात घेत शाळेने बॉम्ब शोधक पथक आणि पोलिसांना कळवण्यात आले आहे.मुंबई पोलिसांनी शाळा रिकामी करुन अधिक तपास करत आहे. 
दोन दिवसांपूर्वी जोगेश्वरी येथील एका शाळेत बॉम्ब असल्याची माहिती ईमेलद्वारे मिळाली होती.मात्र ही माहिती खोटी निघाली.शाळेला ईमेल द्वारे पाठवलेल्या बॉम्बच्या धमकीमध्ये शाळेच्या इमारतीत बॉम्ब ठेवण्यात आल्याचे सांगण्यात आले होते. मात्र ती माहिती खोटी निघाली.
 
यापूर्वी 23 जानेवारीला अंधेरीच्या जोगेश्वरी-ओशिवरा भागात असलेल्या रायन ग्लोबल स्कूलला ही धमकी मिळाली होती. यानंतर स्थानिक पोलीस आणि बॉम्बशोधक पथकाने कारवाई सुरू केली. 
दिल्ली नंतर मुंबईत आता शाळेत बॉम्ब ठेवण्याची धमकीचे सत्र सुरु झाले आहे. मुंबई पोलिसांनी अशा घटना गांभीर्याने घेतल्या असून मुंबई पोलीस आता अलर्ट मोडवर आहेत.
Edited By - Priya Dixit