बुधवार, 27 नोव्हेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. अर्थजगत
  3. वाणिज्य वृत्त
Written By

२९ श्रेणीतील वस्तू आणि ५३ प्रकारच्या सेवांवर जीएसटी कपात

जीएसटी कौन्सिलने २९ श्रेणीतील वस्तू आणि ५३ प्रकारच्या सेवांवर असलेल्या करात कपात करण्याचा निर्णय घेतला आहे. यात हिरे आणि मौल्यवान रत्नांवरील कर ३% वरून ०.२५% करण्यात आला आहे. इतर वस्तूंमध्ये साखरेपासून तयार होणारे मिष्ठान्न, २० लिटर पाण्याच्या बाटल्या, मेंदीचे कोन आणि खासगी वितरकांमार्फत होणारा गॅसपुरवठा यांचा समावेश आहे. पूजेमध्ये वापरली जाणारी विभुती आणि श्रवणयंत्रातील सुटे भागही जीएसटीतून मुक्त करण्यात आले आहेत. स्वस्त होणाऱ्या सेवांमध्ये टेलिरिंग, वॉटर पार्क, थीम पार्क, जाय राइड््स आणि कातड्याच्या वस्तूंसंबंधी काम यांचा समावेश आहे. हे दर २५ जानेवारीपासून लागू होतील.
 
गुरुवारी कौन्सिलची २५ वी बैठक झाली. अर्थमंत्री अरुण जेटली म्हणाले, पेट्रोल-डिझेल आणि रिअल इस्टेटवर बैठकीत चर्चा झाली नाही असे सांगितले.