परत एकदा ग्रेट इंडियन सेल, एचडीएफसी ग्राहकांना 10 टक्के कॅशबॅक
ऑनलाईन खरेदी विश्वातील मातब्बर कंपनीने परत एकदा ग्रेट इंडियन सेल जाहीर केला आहे. एक कोटी 60 लाख उत्पादनावर सूट दिली जाणार आहे. हा सेल 21 जानेवारी ते 24 जानेवारी 2018 या दरम्यान असणार आहे. या सेल दरम्यान ग्राहकांना वेगवेगळ्या ब्रॅँडेड उत्पादनांवर प्रचंड सूट मिळणार आहे. यात अॅपल, वनप्लस, सॅमसंग, यूसीबी, प्युमा, अदिदास, रॅँगलर, टायटन, अमेरिकन टुरिस्टर, बीपीएल, मायक्रोमॅक्स, टिसीएल, लेनोवा, एचपी, एलजी, बजाज, उषा यासारख्या असंख्य ब्रॅँड्सचा समावेश आहे.
