1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
  4. Shri Ambabai temple will be closed for four days from today

कोल्हापूर : श्री अंबाबाईच्या मूळ मूर्तीचे दर्शन आजपासून चार दिवस बंद राहणार

Mahalaxmi devi Kolhapur
संवर्धन प्रक्रियेमुळे श्री अंबाबाईच्या मूळ मूर्तीचे दर्शन आजपासून चार दिवस बंद राहणार आहे. अशी माहिती समोर आली आहे. 
 
मिळालेल्या माहितीनुसार कोल्हापूरच्या करवीर निवासिनी श्री अंबाबाई मंदिराबाबत ही अत्यंत महत्त्वाची अपडेट आहे. जर तुमचा किंवा तुमच्या ओळखीच्या कोणाचा कोल्हापूरला दर्शनाचा प्लॅन असेल, तर ही माहिती नक्की लक्षात घ्या. 
 
पुरातत्त्व विभागामार्फत मंदिराच्या मुख्य गाभाऱ्याचे जतन आणि संवर्धन करण्याचे काम हाती घेण्यात आले आहे. मंदिराचे दगडी बांधकाम अधिक मजबूत करण्यासाठी आणि वास्तूचे आयुष्य वाढवण्यासाठी हे वैज्ञानिक प्रक्रियेचे काम अत्यंत आवश्यक आहे.
 
तसेच आज शनिवार, १४ मार्च २०२६ ते मंगळवार, १७ मार्च २०२६ पर्यंत एकूण ४ दिवस दर्शन बंद राहील.  देवीच्या मूळ मूर्तीचे दर्शन आणि गाभारा प्रवेश या काळात पूर्णपणे बंद असेल.
भाविकांची निराशा होऊ नये म्हणून 'उत्सव मूर्ती' आणि 'तत्त्व कलशाचे' दर्शन पितळी उंबऱ्याबाहेरून (मुक्ती मंडप) घेण्याची सोय करण्यात आली आहे. मंदिरातील रोजचे नित्य विधी, पूजा आणि आरत्या परंपरेनुसार सुरू राहतील, मात्र त्या सामान्य भाविकांच्या उपस्थितीशिवाय पार पडतील.
 
दर्शन पुन्हा कधी सुरू होईल?
संवर्धनाचे काम पूर्ण झाल्यावर आणि शुद्धीकरण विधी पार पडल्यानंतर, बुधवार १८ मार्च २०२६ पासून सकाळी पुन्हा नेहमीप्रमाणे मूळ मूर्तीचे दर्शन सुरू होईल.
Edited By- Dhanashri Naik
पुढील लेख
विदर्भ, मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रातील ११ जिल्ह्यांना विजांच्या कडकडाटासह पावसाचा 'यलो अलर्ट' जारी