1. मराठी बातम्या
  2. अर्थजगत
  3. वाणिज्य वृत्त
Written By

बजेटनंतर पेट्रोल-डिझेल झालं स्वस्त

budget 2018
नवी दिल्ली- अर्थसंकल्पात वित्तमंत्री अरुण जेटली यांनी एक्साईज ड्यूटीमध्ये कपात करण्याची घोषणा केली म्हणून पेट्रोल-डिझेल स्वस्त झाले. देशभरात पेट्रोल डिझेलच्या किंमतीत २ रूपयांनी कपात झाली आहे. यानंतर मध्यम वर्गीय लोकांना जरा तरी राहत मिळाली आहे.
 
सध्या देशभरात डीझेलची किंमत रेकॉर्ड उँचीवर आहे. सोबतच पेट्रोलचे भावदेखील वाढलेलेच होते. आंतरराष्ट्रीय बाजारात क्रूड तेलाचे भाव वाढल्याने आणि भारतीय रूपयात आलेल्या घसरणीमुळे पेट्रोल-डिझेलचे भाव वाढत आहेत. गेल्या महिन्यात म्हणजे जानेवरीत पेट्रोलचे दर २.९५ रूपये इतके वाढले आहे. 
 
सरकारने पेट्रोलवरील एक्साईज ड्युटी २ रूपयांनी घटवून ४.४८ रूपये प्रति लिटर केली आहे. तेच डिझेलवरील एक्साईज ड्युटी २ रूपयांनी घटवून ६.३३ रूपये प्रति लिटर केली.