शुक्रवार, 10 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. अर्थजगत
  3. वाणिज्य वृत्त
Written By

फक्त 13500 रुपयात करा अमेरिकेचा प्रवास

भारत ते अमेरिका प्रवास करायचं म्हटलं तर तिकट किती महागात पडेल सर्वात आधी हाच प्रश्न आपल्या मनात येत असेल. पण आता हा प्रवास मात्र फक्त 13500 रुपयात घडणार आहे. आइसलँडच्या 'वॉव एअर' या विमानसेवा कंपनीने सर्वात स्वस्त विमान प्रवासाची घोषणा केली आहे. दिल्ली ते अमेरिका ट्रिपसाठी ही रक्कम सध्याच्या विमान प्रवास भाड्याच्या तुलनेत खूप कमी आहे. केवळ चॅन इन बॅग आणि आवडत्या सीटसाठी वेगळे पैसे मोजावे लागतील. कंपनी बिझनेस क्लाससाठी 46556 रुपयात तिकट देईल.
 
भारताती ही सेवा डिसेंबरपासून सुरू होणार असून पहिले उड्डाण ७ डिसेंबरला होणार आहे. दिल्ली विमानतळावरून सुटणारं विमान आईसलँडची राजधानी रेकजॅविकमार्गे न्यूयॉर्क, सॅन फ्रॅन्सिस्को किंवा लॉस एंजेलिस येथे उतरेल. भारत आणि अमेरिकेतून दररोज सुमारे २० हजार प्रवासी ये-जा करतात. या सर्वांसाठी हा प्रवास नक्कीच फायदेशीर ठरेल अशीही माहिती विमानसेवेचे संस्थापक स्कली मॉगेनसन यांनी दिली.