मंगळवार, 24 डिसेंबर 2024
  1. मराठी ज्योतिष
  2. ग्रहमान
  3. जन्मदिवस आणि ज्योतिष
Written By वेबदुनिया|

आज तुमचा वाढदिवस आहे (13.05.2018)

दिनांक 13 तारखेला जन्म घेतलेल्या व्यक्तीचा मूलक 1+ 3 = 4 असेल. या अंकाचे व्यक्ती जिद्दी, कुशाग्र बुद्धीचे, साहसी असतात. या व्यक्तींना जीवनात बर्‍याच परिवर्तनांचा सामना करावा लागतो. जसे फराट्याने येणार्‍या गाडीला अचानकच ब्रेक लागतो, तसेच या लोकांचे भाग्या होते. पण हे ही तेवढेच खरे की या अंकाचे अधिकतर लोक कुलदीपक असतात. तुम्हाला जीवनात बर्‍याच अडचणींना मात करावे लागते. यांच्यात अभिमानही असतो. हे लोक कोमल हृदयाचे असतात पण बाहेरून फारच कठोर दिसतात. यांच्यात उत्तम नेतृत्व क्षमता असते. 

शुभ दिनांक : 4, 8, 13, 22, 26, 31

शुभ अंक : 4, 8,18, 22, 45, 57

शुभ वर्ष : 2015, 2020, 2031, 2040, 2060

ईष्टदेव : गणपती, मारुती

शुभ रंग : निळा, काळा, भुरकट

कसे राहील हे वर्ष
ज्या लोकांची जन्म तारीख 4, 13, 22, 31 आहे त्यांच्यासाठी हे वर्ष थोडे सावधगिरी बाळगण्याचे आहे. वर्षाचा स्वामी गुरु व मूलक स्वामी राहू यांच्यात परम शत्रुता आहे. गुरु-राहूची युती चांडाल योग निर्माण करते. प्रकृतीकडे दुर्लक्ष करू नये. पारिवारिक जीवनात सतर्कता ठेवणे गरजेचे आहे. नवीन रोजगार जानेवारीनंतर मिळण्याचे योग आहे. आर्थिक बाबतीत सावधगिरी बाळगा. शत्रू पक्षाकडून सांभाळून राहा. कर्मक्षेत्रात विशिष्ट कामांमुळे वेळ जाईल. काम जास्त असल्याने थकवा जाणवेल. व्यवसायात हानी संभव. उगाच पैसा उधळू नये. वेळ जाऊ देऊ नका. हा फार उपयोगाचा आहे लक्षात ठेवावे.

मूलक 4चे प्रभावशाली विशेष व्यक्ती
* जार्ज वाशिंगटन
* रितु शिवपुरी
* नम्रता शिरोडकर
* उर्मिला मार्तोंडकर
* जावेद जाफरी