मंगळवार, 24 डिसेंबर 2024
  1. मराठी ज्योतिष
  2. ग्रहमान
  3. ग्रह-नक्षत्रे
Written By वेबदुनिया|

राहू-शनीचा कुप्रभाव

कधी कधी असं होतं की तुम्ही कुणाच्या घरी जाता पण तेथे 5 मिनिटापेक्षा जास्त काळ तुम्ही राहू शकत नाही. तुमचा जीव घाबरल्यासारखा वाटतो. पण हा दोष तुमचा नसून घरात येणार्‍या किरणांचा असतो. कुठल्याही घरात बसल्या बसल्या वादविवाद निर्माण होतात. मुलं मोठ्यांचे अपमान करतात, लहान-सहान गोष्टीसुद्धा मोठमोठे ताणतणाव निर्माण करतात. अशा घरात शनी व राहूच्या नकारात्मक ऊर्जेचा प्रवाह होतो.

अशावेळी काय करायला पाहिजे?
घरातील वातावरणाला सौहार्दपूर्ण ठेवावे.
घरात नेहमी सुवासांचा (चंदन, कापूर) वापर करावा.
घराच्या आत व बाहेर तुळशी व सीझनल फुलांचे रोप लावावे
सकाळ व सायंकाळी पूजा आरती करावी.
घरात लोखंडांच्या फर्निचरचा वापर कमीत कमी करावा
अभ्यास करताना पाण्याची वाटी समोर ठेवून बसावे
मोहरी-लवंग-राजमा व उडदाच्या डाळीचे सेवन कमी करावे.
रबराचा वापर कमी करावा.
महिन्यातून एक किंवा दोनदा उपास करून दान करावे
मासोळ्यांची सेवा करावी.