रविवार, 26 जानेवारी 2025
  1. मनोरंजन
  2. मराठी सिनेमा
  3. नाट्य-चित्र गप्पा
Written By
Last Modified: गुरूवार, 7 जून 2018 (08:55 IST)

'फर्जंद' साठी मनसे आक्रमक

'फर्जंद' या मराठी चित्रपटाला मुंबई एकही प्राईम टाईम शो मिळत नसल्यामुळे मनसे आक्रमक झाली आहे. चित्रपटाला तात्काळ प्राईम टाईम द्या अन्यथा आंदोलनाचा इशारा दिला आहे. या प्रकारामुळे नाराज झालेल्या 'फर्जंद' चित्रपटाच्या निर्मात्यांनी महाराष्ट्र नवनिर्माण चित्रपट सेनेचे अध्यक्ष अमेय खोपकर यांच्याकडे धाव घेतली. या चित्रपटाला मुंबईत प्राईम टाईमचा शो नसल्याचा मनसेकडून निषेध व्यक्त करण्यात आला.
 
'फर्जंद' हा शिवाजी महाराजांच्या मावळ्यावर आधारित ऐतिहासिक चित्रपट शुक्रवारी 1 जून रोजी महाराष्ट्रात प्रदर्शित झाला. या चित्रपटाचे मुंबईतील चित्रपटगृहात 90 खेळ होत असून, ते सर्व सकाळी 11 ते दुपारी 1.30 या वेळेत होत आहेत.