शनिवार, 25 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: बुधवार, 6 जून 2018 (08:42 IST)

दहावीचा निकाला 11 जून रोजी, येथे आणि असा पहा निकाल

बारावी नंतर आता महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्यावतीने घेण्यात आलेल्या दहावी परीक्षेच्या निकालाची तारीख जाहीर करण्यात आहे. हा निकाल सोमवार (11 जून) रोजी बोर्डाच्या वेबसाईटवर जाहीर होणार आहे. सकाळी 11 वाजता दहावीचा निकाल जाहीर झाल्यानंतर, दुपारी 1 पासून विद्यार्थ्यांना ऑनलाईन निकाल पाहता येईल. सोबतच  बोर्डाने विविध संकेतस्थळावर निकाल पाहण्याची सोय केली आहे.
निकाल कुठे पाहाल?
 
http://mahresult.nic.in/ या वेबसाईटवर विद्यार्थ्यांना त्यांचा सविस्तर निकाल पाहायला मिळणार आहे. 
 
निकाल पाहण्यासाठी इतर वेबसाईट :
 
 
कसा पाहाल निकाल?
 
दहावीचा निकाल पहाण्यासाठी तुम्ही तुमचा नंबर स्पेसशिवाय टाईप करा. त्यानंतर खालच्या रकान्यात तुमच्या आईच्या नावाची पहिली तीन अक्षरं लिहावी लागतील.समजा तुमचा नंबर P६५४३२१  असा आहे आणि तुमच्या आईचं नाव Megha  आहे, तर तुम्हाला पहिल्या रकान्यात P६५४३२१  हा नंबर आणि दुसऱ्या रकान्यात कॅपिटलमध्ये MEG असं लिहावं लागेल.