शनिवार, 25 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: सोमवार, 4 जून 2018 (15:18 IST)

विनोद तावडे राज ठाकरे यांच्या भेटीला

भाजपा नेते आणि शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची कृष्णकुंजवर जाऊन भेट घेतली आहे. यावेळी या दोघांमध्ये बंद दाराआड जवळपास तासभर चर्चा झाली. या चर्चेची माहिती अद्यापही सार्वजनिक करण्यात आलेली नाही.
 
आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर ही भेट महत्त्वाची मानली जात आहे. दुसरीकडे ठाण्यात होऊ घातलेल्या नाट्यसंमेलनाचं निमंत्रण देण्यासाठी विनोद तावडे गेल्याची चर्चा आहे. तसेच स्वतः विनोद तावडेंनीही निमंत्रण देण्यासाठी गेल्याची माहिती दिली आहे.