रविवार, 26 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. लोकप्रिय
Written By

राज ठाकरें यांनी चहा - वडापाववर मारला ताव

कोकण दौऱ्यात राज ठाकरेंनी यांनी  चक्‍क एका स्‍टॉलवर वडापाव खाल्‍ला. बुधवारी सायंकाळी देवगड येथील आपला दौरा आटोपून ते कणकवलीच्या दिशेने जात होते. यावेळी त्यांनी अचानक गाडयाचा ताफा थांबवून कोळोशी बाजारपेठेतील एका छोट्याशा स्‍टॉलवर  वडापाव आणि चहाचा मनापासून आस्वाद घेतला. 
 
राज यांना वडापाव स्टॉलवर पाहून अनेकांच्या भुवया उंचावल्या होत्‍या.  गाडी थांबताच राज यांनी तेथील श्रीकृष्ण उर्फ संदीप शिंदे यांच्या हॉटेल आसरामधील वडापावचा स्टॉल गाठला. राज यांनी सामान्य ग्राहकाप्रमाणे शिंदे यांच्याकडून वडापाव घेतला आणि बाकड्यावर बसून गरम-गरम वडापावचा आस्‍वाद घेवू लागले. काही वेळात ही बातमी परिसरातील लोकांना समजताच नागरिकांनी शिंदे यांच्या हॉटेलवर गर्दी केली.  यावेळी त्‍यांनी उपस्थितांना वडापाव खाणार काय? अशी विचारणा केली. राज यांनी अनेक ठिकाणच्या गप्पा करत-करत वडापाव आणि चहाचा आस्वाद घेतला. हॉटेलवर जमलेल्या नागरिकांनाही वडापाव वाटप करण्यास कार्यकर्त्यांना सांगितले. शेवटी वडापाव मस्त होता हो! असे म्हणत शिंदे कुटुंबीयांसोबत त्यांनी फोटो देखील काढला आणि शिंदे यांचा निरोप घेतला.