गुरूवार, 28 ऑगस्ट 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By

राज यांनी आदिवासी पाड्यावर घेतला जेवणाचा आनंद

Raj Thackeray
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पालघरमध्ये आदिवासी पाड्यावर जाऊन जेवण घेतलं. मनसैनिकाच्या घरी जमिनीवर बसून राज यांनी भोजनाचा आनंद घेतला. राज ठाकरे यांनी ट्वीट केलेला फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. राज ठाकरेंनी आपला दौरा सुरु केला आहे. यात पालघरमध्ये असताना आदिवासी पाड्यात जाऊन मनसैनिक रवी जाधव यांच्या घरी राज ठाकरेंनी जेवण घेतलं.  राज ठाकरेंनी नुकतीच ट्विटरवर एन्ट्री घेतली आहे, त्यामुळे लगेचच त्यांनी या सहभोजनाचा फोटो ट्वीट केला. 
 
'पालघर जिल्ह्यातील वाडा तालुक्यातील कुंतल गावात माझा महाराष्ट्र सैनिक रवी जाधव यांच्या घरी जेवायला गेलो होतो. रवी हे मनसेचे वाडा विभाग अध्यक्ष आणि कुंतल ग्रामपंचायत सदस्य आहेत' अशी माहिती राज ठाकरेंनी दिली आहे.