एग पराठा
साहित्य : 2 अंडी, 2 बारीक चिरलेला कांदा, 1 चमचा बारीक चिरलेली कोथिंबीर, 2 बारीक चिरलेल्या हिरव्या मिरच्या, 1 टेबल चमचा आल्याची पेस्ट, 1/4 टेबल चमचा हिंग, 1/2 टेबल चमचा जिरं, 1/2 टेबल चमचा काळेमिरे पूड, 1/2 टेबल चमचा हळद, 1/2 टेबल चमचा तिखट, 1/2 टेबल स्पून गरम मसाला पूड, कणीक, मीठ चवीनुसार, तेल.
कृती : सर्वप्रथम मिक्सिंग वाउलमध्ये दोन अंडी फोडून चांगल्या प्रकारे त्याला फेटून घ्या. आता यात बारीक कापलेला कांदा, मिरची, मीरे पूड, गरम मसाला, तिखट, आल्याची पेस्ट, जिरं, हळद आणि मीठ घालून चांगल्या प्रकारे फेटून घ्या. फेटल्यानंतर यात चिरलेली कोथिंबीर घालून मिक्स करा.
यानंतर कणकेचे त्रिकोणी पराठे बनवून घ्या, ज्यात लेयर्स येतील.
त्रिकोणी पराठ्यांना पॅनकेकमध्ये शेकून घ्या.
यानंतर याला पॅनकेकमधून बाहेर काढून त्याच्या एक लेअरमध्ये अंड्याचे मिश्रण भरून द्या.
या पराठ्याला तेल लावून परत शेकून घ्या. सर्व्ह करताना पराठ्याला त्रिकोणी आकारात कापावे आणि गार्निशिंगकरून सर्व्ह करावे.