मंगळवार, 24 डिसेंबर 2024
  1. लाईफस्टाईल
  2. खाद्य संस्कृती
  3. मांसाहारी
Written By

वरुत्तारच्च चिकन करी

सामग्री  
कोंबडी - ½ किग्रॅम (बोनलेस)
खोबरं (किसलेलं) - 1 कप
आलं - 1 इंच लांब तुकडे
लसूण - 6
हिरवी मिरची - 6
खोबरेल तेल 
छोटे कांदे - 1 कप
मोठे कांदे - 1
टॉमेटो - 1
लाल तिखट - 1 चमचा
हळद - ½ चमचा
धणे पूड - 2 चमचे
गरम मसाला - ½ चमचा
कढीपत्त्याची पाने
मीठ
 
कृती
भांड्यात दोन चमचे तेल गरम करा आणि किसलेलं खोबरं भाजून घ्या. त्यात धणे पूड, लाल तिखट, गरम मसाला, हळद घाला आणि चांगले परता. मिश्रणाचा रंग तपकिरी झाल्यावर त्याची पेस्ट बनवा आणि बाजूला ठेवा. 
 
आता एक भांडे घ्या आणि थोडे तेल गरम करा. त्यात थोडी कढीपत्त्याची पाने घाला. त्यात, छोटे कांदे, आलं, हिरव्या मिरच्या आणि लसूण यांचे मिश्रण घाला. थोडा वेळ भाजा. आता कोंबडीचे तुकडे आणि मीठ घालून परता. दोन कप पाणी घाला. सावकाशपणे ढवळा. भांड्यावर झाकण घालून काही वेळ शिजू द्या. 
 
भांडे उघडा आणि त्यात मोठे कांदे आणि टोमॅटो घाला. अजून थोडे पाणी घाला. आता भांडे झाकून ठेवा आणि वीस मिनिटे शिजवा.
 
तुम्ही आता झाकण काढू शकता आणि बाजूला दळून ठेवलेला मसाला त्यात घाला. अजून थोडे पाणी घाला. व्यवस्थित ढवळा. थोडी कढीपत्त्याची पाने घाला आणि अजून साधारण 10 मिनिटे मंद आचेवर शिजवा. 
 
हया मसालेदार चिकन डीशचा आस्वाद घेण्यासाठी तयार रहा.

साभार : केरळ टुरिझम