शनिवार, 11 जानेवारी 2025
  1. लाईफस्टाईल
  2. खाद्य संस्कृती
  3. चव दक्षिणेची
Written By
Last Modified: शनिवार, 28 एप्रिल 2018 (14:29 IST)

वेल्लरिका खिचडी

वेल्लरिका खिचडी, काकडीची दह्यातली कोशिंबीर बनविण्यास सोपी आणि तजेलदार थंडावा देणारी आहे. 
 
सामग्री 
काकडी (बारीक तुकडे केलेली) - 2 कप
दही (आंबट नसलेले) - 1 कप
खोवलेला नारळ- 1/2 कप
हिरव्या मिरच्या (लहान गोल तुकडे कापलेले) - 3
लहान कांदे - 2
जिरे- ½ चमचा
मोहरी- ½ चमचा
कढीपत्ता
मीठ
 
कृती
खोवलेला नारळ, लहान कांदे आणि जिरे एकत्र वाटा. त्यात वाटलेली मोहरी घालून चांगले मिसळा. काकडी थोडे पाणी, मिरची आणि मीठ घालून शिजवा. भांड्यातले सगळे पाणी संपले की, नारळाचे वाटलेले मिश्रण घाला आणि चांगले मिसळा. मोहरी, लाल मिरची आणि कढीपत्ता तडतडवून फोडणी करा व ती यावर घाला. मिश्रण थंड झाल्यावर दही घाला आणि चांगले मिसळा. 
 
श्रीमती. लीला वेणू कुमार 
 
साभार : keralatourism