शनिवार, 25 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified: मंगळवार, 5 जून 2018 (17:05 IST)

शशी थरुर यांना कोर्टात हजर राहण्याचे आदेश

काँग्रेस नेते शशी थरुर यांना पत्नी सुनंदा पुष्कर यांच्या मृत्यू प्रकरणात दिल्लीच्या पटियाला हाऊस कोर्टाने त्यांना आरोपी मानले आहे. याप्रकरणी थरुर यांना ७ जुलै रोजी कोर्टात हजर राहण्याचे आदेश मंगळवारी कोर्टाने दिले. थरुर यांनीच सुनंदा यांना आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा आरोप आहेदिल्ली पोलिसांनी सुनंदा पुष्कर मृत्यूप्रकरणी ३००० पानांचे आरोपपत्र कोर्टात सादर केले. या आधारे कोर्टाने थरुर यांना आरोपी मानले आहे. या प्रकरणी अनेकदा पोलिसांनी शरुर यांची चौकशी केली आहे. 

दिल्ली पोलिसांनी थरुर यांच्याविरोधात दिल्लीच्या पटियाला हाऊस कोर्टात कलम ३०६ आणि ४९८ अंतर्गत आरोपपत्र दाखल केले आहे. दिल्ली पोलिसांनी कलम ३०६नुसार, थरुर यांच्यावर सुनंदा पुष्कर यांना आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा आरोप केला आहे. त्याचबरोबर घरगुती हिंसाचार प्रकरणी कलम ४९८ ए देखील लावण्यात आले आहे.