मंगळवार, 5 ऑगस्ट 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified: सोमवार, 4 जून 2018 (15:22 IST)

चिकन बनवल नाही, दारुड्या मुलाने केली आईची हत्या

crime in AP
आंध्रप्रदेशच्या गुंटूरमध्ये जेवणात चिकन बनवलं नाही म्हणून नशेत असलेल्या एका मुलाने आईची हत्या केल्याची घटना घडली आहे. बेजम मरियम्म (८०) असं मृत महिलेचं नाव असून तिचा मुलगा बेजम किशोर (४५) यानंच तिची हत्या केली आहे. या हत्येनंतर आरोपी किशोर हा फरार आहे.
 
रविवारी किशोरने घरी जेवणासाठी चिकन आणले आणि आईला चिकनचा रस्सा तयार करायला सांगून तो दारू पिण्यासाठी निघून गेला. घरी परत आल्यावर अजून जेवणासाठी चिकन बनवलं नसल्याचं पाहून किशोर आईवर संतापला. रागाच्या भरात नशेत असलेल्या आरोपीने आईवर चाकूने वार करत तिची हत्या केली. हत्येनंतर त्याने घटनास्थळावरून पळ काढला. किशोरच्या आईचा रडण्याचा आवाज ऐकून शेजाऱ्यांनी त्यांच्या घरी धाव घेतली. मात्र त्यांची अवस्था पाहून त्यांनी तातडीने पोलिसांना याबाबत माहिती दिली.