1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified: लखनऊ , शुक्रवार, 1 जून 2018 (09:16 IST)

…अखेर सरकारी घर सोडलं अखिलेश यादव यांनी

Akhilesh Yadav
समाजवादी पक्षाचे प्रमुख अखिलेश यादव यांनी अखेर लखनऊमधील सरकारी बंगला सोडला आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानंतर त्यांनी बंगला सोडला आहे. याआधी अखिलेश आणि मुलायम सिंग यादव यांनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेत बंगला सोडण्यासाठी दोन वर्षांची मुदत वाढवून मागितली होती.
 
अखिलेश यांनी उत्तर प्रदेशात पार पडलेल्या पोटनिवडणुकीसंबंधी पत्रकारांशी संवाद साधला होता. यावेळी त्यांना सरकारी बंगला सोडण्यासंबंधी विचारण्यात आलं. “आम्ही बंगला सोडण्यासाठी तयार आहोत, मात्र त्यासाठी वेळ पाहिजे. माझ्याकडे आणि नेताजींकडे (मुलायम सिंह) लखनऊत राहण्यासाठी कोणतंही घर नाहीये. जर तुम्ही शोधू शकत असाल तर आम्हाला सांगा”,असं अखिलेश यादव यांनी म्हटलं होतं.