मंगळवार, 24 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. लोकप्रिय
Written By
Last Modified: बुधवार, 30 मे 2018 (17:31 IST)

बायकोला काळी म्हटले, झाला घटस्फोट

रागाच्या भरात बायकोला काळी म्हणून हिणवणे घटस्फोटाला कारण ठरू शकते. पंजाब आणि हरयाणा उच्च न्यायालयाने महेंद्रगडच्या एका महिलेने दाखल केलेल्या गैरवर्तन संबंधित खटल्यावर सुनावणी करताना घटस्फोटाची परवानगी दिली आहे. महिलेने दाखल केलेल्या याचिकेवरील सुनावणी दरम्यान पीडित पत्नीने तिच्यासोबत घडलेलं गैरवर्तन पुराव्यानिशी सिद्ध केलं. आपल्याला ‘काली-कलुटी’ म्हटल्याचे बायकोने दिलेले कारण न्यायालयाने ग्राह्य धरले आहे. न्यायालयात सादर करण्यात आलेले पुरावे हे पीडित महिलेला मानसिक आणि शारीरिक स्तरावर त्रस्त करण्यात आल्याचे सिद्ध करण्यास पुरेसे असल्याचं न्यायालयाने आपल्या आदेशात म्हटलं आहे.

न्यायमूर्ती एमएमएस बेदी आणि न्यायमूर्ती गुरविंदर सिंग गिल यांच्या खंडपीठाने हा निकाल दिला. यावेळी महेंद्रगडच्या कौटुंबिक न्यायालयाने या प्रकरणात दिलेला निकाल उच्च न्यायालयाने रद्द केला.