शनिवार, 25 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: मंगळवार, 29 मे 2018 (17:21 IST)

रेल्वे डब्याला आग, जीवितहानी नाही

मुंबई येथील सीएसएमटी रेल्वे स्टेशनच्या प्लॅटफॉर्मवरच्या 18 येथे, सोलापूर एक्सप्रेसच्या रिकाम्या डब्याला अचानक आगीची घटना घडली आहे. यावेळी लगेच अग्निशमन दलाच्या चार गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या आहेत. आगीवर नियंत्रण मिळवण्याचे काम सुरू झाले आहे. यामध्ये स्थानकावर दूर जाणाऱ्या  गाड्या उभ्या असलेल्या यार्डात सोलापूर एक्स्प्रेसच्या डब्याला आग लागल्यानं फलाटावरील प्रवाशांमध्ये एकच गोंधळ उडाला होता. मात्र या आगीत कोणतीही जीवितहानी झालेली नाही. तर आगीचे कारण अद्याप अस्पष्टच आहे.

या  आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आले असून, आगीमुळे एकाच बोगीचे नुकसान झाले. या आगीबाबत सविस्तर माहिती घेण्याचे काम सुरू आहे. यार्डसारख्या भागात प्रत्येक ठिकाणी सुरक्षा पुरवणे शक्य नाही तरी देखील अग्निशमन दलाने चांगली कामगिरी करत तात्काळ आगीवर नियंत्रण मिळवले, अशी माहिती मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक डी. के. शर्मा यांनी दिली आहे.