शनिवार, 11 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. लोकप्रिय
Written By
Last Modified: मंगळवार, 29 मे 2018 (09:28 IST)

अहो आश्चर्यम, झाडाला ४ किलो वजनाचे आंबे

तुळजापूर तालुक्यातील जळकोट येथील ओम अंगुले यांच्या शेतातील केशर आंब्याच्या झाडाला चार किलो वजनाचे आंबे लगडले आहेत. त्यामुळे अनेकजण या आंब्याला पाहून अक्षरशः आश्चर्याने तोंडात बोट घातली आहेत.
 

यंदा झाडाला मोठ्या प्रमाणात फळधारणा झाली आहे. त्यातील एका झाडाला चक्क एक फूट लांब आणि साधारणतः तीन ते चार किलो वजनाचे भले मोठे आंबे लगडले आहेत. दोन हातात न मावणारे हे मोठे आंबे पाहून अनेकांना आश्चर्य वाटत आहे. पाण्याचे योग्य नियोजन, झाडांची शास्त्रीय दृष्टिकोनातून घेतलेली काळजी आणि निसर्गातील विविध घटकांची योग्य साथ लाभल्यास, असे विक्रमी उत्पन्न सहज पदरात पडू शकते, अशी प्रतिक्रिया अंगुले यांनी दिली. त्यांच्या बागेतून एकरी पाच लाखापर्यंतचे उत्पन्न यंदा मिळू शकेल असा त्यांचा अंदाज आहे.