रविवार, 26 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified: मंगळवार, 29 मे 2018 (09:19 IST)

सीबीएसईच्या १० वी चा आज निकाल

केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे (सीबीएसई) घेण्यात आलेल्या दहावीच्या परिक्षेचा निकाल आज दुपारी ४ वाजता जाहीर होणार आहे. दोनच दिवसांपूर्वी सीबीएसईच्या १२ वीच्या परिक्षेचा निकाल जाहीर झाला आहे. cbseresults.nic.incbse.nic.in and results.nic.in. या संकेतस्थळांवरही विद्यार्थ्यांना त्यांचा निकाल पाहता येणार आहे.

निकाल असा पहा 

पहिली पायरी – cbse.nic.in या वेबसाइटवर जा, दुसरी पायरी – CBSE 10th Result 2018, CBSE Class 10th Result 2018 ही लिंक शोधा व तिच्यावर क्लिक करा. तिसरी पायरी – आपला रोल नंबर भरा, चौथी पायरी – तुमचा निकाल स्क्रीनवर दिसेल, तो डाउनलोड करा म्हणजे तो तुम्हाला नंतरही उपयोगी येऊ शकेल.