बुधवार, 27 नोव्हेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: सोमवार, 28 मे 2018 (08:47 IST)

येत्या ७ ते १० जूनपर्यंत मोसमी पाऊस येणार

रबी समुद्रातील मेकुणू चक्रीवादळ पूर्णपणे क्षीण झाल्यामुळे नैर्ऋत्य मोसमी पावसाला पोषक वातावरण निर्माण झाले आहे. कमी दाबाचे क्षेत्र पूर्व अरबी समुद्र आणि केरळ, कर्नाटक किनारपट्टीजवळ आहे. त्यामुळे मंगळवापर्यंत मोसमी पाऊस केरळमधून देशात प्रवेश करेल. त्यानंतर ७ ते १० जूनपर्यंत त्याचे राज्यात आगमन होईल, असा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे.

मोसमी पाऊस पुढील ४८ तासांमध्ये केरळचा काही भाग, दक्षिण अरबी समुद्र, मालदीव, कोमोरिन, तामिळनाडूचा काही भाग व्यापणार आहे. त्यानंतर त्याचा देशातील प्रवास सुरू होईल. हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार सोमवारी बंगालच्या उपसागरात कमी दाबाचे क्षेत्र तयार होणार आहे. केरळ किनाऱ्यालगत अरबी समुद्रात २.१ किलोमीटर उंचीवर चक्राकार वारे वाहात आहेत. त्यामुळे लक्षद्वीप बेटे, केरळ, कर्नाटक किनाऱ्यावर दाट ढगांचे आच्छादन तयार झाले असून, या भागात मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे.