मंगळवार, 19 ऑगस्ट 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified: सोमवार, 28 मे 2018 (08:43 IST)

मोमोज खाण्याचा हट्ट केला, मद्यधुंद पित्याने मुलाला नदीत फेकले

momos

दिल्लीतील जैतापूर परिसरात मद्यधुंद पित्याकडे मुलाने  मोमोज खाण्याचा हट्ट केला म्हणून नदीत फेकून दिल्याची  घटना समोर आली आहे. या घटनेत मुलाचे  नाव अयान (६) असून  संजय अल्वी (३१) असे या नराधम पित्याचे नाव आहे. दारू पिऊन तर्राट असलेल्या बापाला मुलाचा हट्ट डोकेदुखी वाटली व त्याने  त्याला उचलून नदीत फेकून दिले. हे बघताच आजूबाजूच्या लोकांनी त्याला बेदम मारहाण केली व पोलिसांच्या ताब्यात दिले. 

अयान वडील व दोन भावंडासह मदनपूर खादर भागात राहत होता. संजयला दारुचे व्यसन असल्याने रोजच्या त्रासाला कंटाळून त्याची पत्नी आठ वर्षीपूर्वी तीन मुलांना त्याच्याजवळ सोडून कायमची माहेरी निघून गेली होती. संजयला दारुच्या व्यसनामुळे कोणीही काम देत नव्हते. यामुळे मिळेल ते काम करुन तो मुलांचा सांभाळ करत होता व उरलेले पैसे दारुमध्ये उडवत होता.ते दोघे नदीवरील खादर पुलावरुन जात होते. त्याचवेळी अयानची नजर पुलावर मोमोज विकणाऱ्याकडे गेली व त्याने संजयकडे मोमोजचा हट्ट केला. हे बघून संजय चिडला त्याने अयामला उचलले व सरळ नदीत फेकून दिले.