रविवार, 28 एप्रिल 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified: सोमवार, 28 मे 2018 (08:42 IST)

रेल्वेकडून स्वच्छतेसाठी पुढाकार

रेल्वे स्थानकावरील व स्थानकाबाहेरील स्वच्छतागृहांमध्ये आता स्वस्तात सॅनिटरी नॅपकिन्स आणि कंडोम मिळणार आहेत. रेल्वे बोर्डाने नुकतीच स्वच्छतागृहविषयक धोरणात ही तरतूद केली आहे. सोबतच  रेल्वे स्थानकावरील स्वच्छतागृहात व बाहेरील स्वच्छतागृहात महिला व पुरुष यांच्याबरोबरच दिव्यांग व्यक्तींसाठी विशेष शौचालय उभारण्याचा निर्णय घेतला आहे. या स्वच्छतागृहांमध्ये सॅनिटरी नॅपकिन्स आणि कंडोमची विक्री केली जाणार आहे. देशातील ८५०० स्थानकांवर अशा प्रकारची सुविधा केंद्र उभारण्यात येणार आहेत.