रविवार, 12 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. लोकप्रिय
Written By
Last Modified: सोमवार, 28 मे 2018 (08:39 IST)

फिफाचे फुटबॉल अॅन्थम ‘लिव इट अप’

रशियात होणाऱ्या ‘फिफा वर्ल्डकप २०१८’साठी  फिफाचे फुटबॉल अॅन्थम लॉन्च झाले आहे. हॉलिवूड अभिनेता आणि रॅपर विल स्मिथने या गाण्याला आवाज दिला आहे. निकी जॅम आमि ईरा इस्त्रेफी यांनीबी स्मिथला साथ दिली आहे. या गाण्याचे नाव ‘लिव इट अप’ आहे.

विल स्मिथने सांगितले की, ‘फिफा विश्व कप २०१८ मध्ये गाणं प्रस्तुत करण्याची संधी मिळाली ही एक सन्मानाची गोष्ट आहे. या स्पर्धेमार्फत संपूर्ण जगभरातील लोकं एकत्र येतात, हसतात, उत्सव साजरा करतात. आम्हाला या गाण्यावर संपूर्ण जगभरातील लोकांनी नाचताना पहायचे आहे.’ हे गाणं ग्रॅमी पुरस्कार विजेता डिल्पोने केले आहे. त्याने सांगितले की, ‘मी आंतराष्ट्रीय स्तरावर हे गाणे तयार केले आहे. तसेच या गाण्याला आणखी सुंदर बनवण्यासाठी अनेक स्टार एकत्र आले आहेत.

फिफा १४ जूनपासून सुरू होणार आहे. २०१८ तील जगातील या सर्वात मोठ्या आयोजन असलेल्या या स्पर्धेची सुरुवात रशिया विरुद्ध सौदी अरेबिया संघांमधील लढतीने होणार आहे. यामध्ये एकूण ३२ संघ खेळणार असून त्यांतील खेळाडूंची नावे आणि लोगो निश्चित करण्यात आले आहेत.