रविवार, 12 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. खेळ मराठी
  3. क्रीडा वृत्त
Written By
Last Modified: गोल्ड कोस्ट , गुरूवार, 12 एप्रिल 2018 (14:21 IST)

राष्ट्रकुल स्पर्धा : महाराष्ट्राच्या राहुल आवारे देखील बनला गोल्डन ब्वॉय

राष्ट्रकुल स्पर्धेत पैलवान राहुल आवारेने महाराष्ट्राची मान अभिमानाने उंचावली आहे. पुरुषांच्या फ्रीस्टाईल कुस्तीत ५७ किलो वजनी गटात राहुलने सुवर्णपदकाची कमाई केली. कॅनडाच्या स्टीव्हन ताकाहाशीवर राहुलने १५-७ अशी मात केली.
 
याव्यतिरीक्त ५३ किलो वजनी गटात भारताच्या बबिता कुमारी फोगटने रौप्यपदकाची कमाई केली. अंतिम फेरीत बबिताला कॅनेडीयन प्रतिस्पर्ध्याकडून हार पत्करावी लागली. तर ७६ किलो हेवीवेट वजनी गटात भारताच्या किरणनेही कांस्यपदकाची कमाई केली. त्याआधी महाराष्ट्राच्या तेजस्विनी सावंतने ५० मी. रायफल प्नोन प्रकारात रौप्यपदकाची कमाई केली.