सोमवार, 27 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: सोमवार, 28 मे 2018 (08:44 IST)

पालघर लोकसभा पोटनिवडणुकीसाठी मतदान सुरु

पालघर लोकसभा पोटनिवडणुकीसाठी सोमवारी अर्थात आज  सकाळी 7 ते संध्याकाळी 6 या वेळेत मतदान सुरु झाले आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यासाठी ही निवडणूक प्रतिष्ठेची बनली आहे. मतदानासाठी 2097 मतदान केंद्रे तयार करण्यात आली असून 12 हजार 894 कर्मचारी तसेच चार हजार 219 सुरक्षा कर्मचारी तैनात करण्यात आले आहेत. या निवडणुकीची मतमोजणी 31 मे रोजी होणार आहे. शिवसेना, भाजप आणि बहुजन विकास आघाडी असा तिरंगी सामना या निवडणुकीत असला तरी खरी लढत सेनेचे श्रीनिवास वनगा आणि भाजपचे राजेंद्र गावित यांच्यातच होण्याची चिन्हे आहेत. 

पालघर जिल्ह्यातील काही ग्रामपंचायतींसाठी रविवारी मतदान झाले.राज्य निवडणूक आयोगाने या ग्रामपंचायत निवडणुकीसाठी मतदारांच्या डाव्या हाताच्या अनामिकेला शाई लावणेचे निर्देश दिले असल्याने भारत निवडणूक आयोगास अन्य बोटाला शाई लावण्यास मान्यता देण्याची विनंती राज्याच्या मुख्य निवडणूक अधिकार्‍यांनी केली. त्यानुसार डाव्या हाताच्या मधल्या बोटाला शाई लावण्याची मान्यता केंद्रीय निवडणूक आयोगाने दिली आहे.