1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. पुणे
  4. 37 crore fraud in land transaction in Pune

पुण्यात जमीन व्यवहारात 37 कोटींची फसवणूक झाल्याचा आरोप; शिवसेनेचे शहराध्यक्ष यांच्यासह १० जणांविरोधात गुन्हा दाखल

पुण्यातील एका सत्ताधारी पक्षाच्या बड्या नेत्याचे नाव या ३७ कोटींच्या घोटाळ्यात आल्याने राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे. यापूर्वी मुंढवा आणि ताथवडे येथील जमीन घोटाळे गाजले असतानाच आता महंमदवाडीतील या प्रकरणामुळे भूमाफियांच्या कारवाया पुन्हा एकदा चर्चेत आल्या आहे.
 
पुणे येथे जमीन व्यवहारात मोठी आर्थिक फसवणूक झाल्याचा प्रकार समोर आला आहे. एका बांधकाम व्यावसायिकाची तब्बल 37 कोटींची फसवणूक केल्याचा आरोप असून पोलिसांनी 10 जणांविरोधात गुन्हा दाखल केला आहे.
 
पुण्यातील महंमदवाडी परिसरात जमीन व्यवहारात तब्बल ३७ कोटी रुपयांची फसवणूक झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या प्रकरणात शिवसेनेचे (शिंदे गट) शहराध्यक्ष प्रमोद ऊर्फ नाना भानगिरे यांच्यासह १० जणांविरोधात वानवडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
फिर्यादींच्या संमतीशिवाय ही जमीन नाना भानगिरे आणि इतरांना विकण्यात आल्याचा आरोप आहे. हा व्यवहार कायदेशीर दाखवण्यासाठी 'यूएलसी'चा (ULC) बनावट आदेश तयार केल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. या प्रकरणात एकूण १० जणांवर गुन्हा दाखल झाला असून त्यात खालील नावांचा समावेश आहे:
 
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सुरुवातीला या व्यवहारासाठी कोणताही मोबदला देण्यात आला नव्हता.  गुन्ह्याची व्याप्ती मोठी असल्याने आर्थिक गुन्हे शाखेने (EOW) या प्रकरणाचा तपास हाती घेतला असून आरोपींच्या अटकपूर्व जामीन अर्जाला न्यायालयात विरोध केला आहे.
Edited By- Dhanashri Naik
पुढील लेख
Bank Alert: या आठवड्यात सलग ५ दिवस बँका बंद राहण्याची शक्यता; महत्त्वाची कामे उरकून घेण्याचे आवाहन