बुधवार, 25 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified: सोमवार, 28 मे 2018 (14:28 IST)

प्रणवदा आरएसएसच्या वर्गाला संबोधित करणार

भारताचे माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी ७ जूनला राष्ट्रीय स्वयंमसेवक संघाच्या मुख्यालयात येणारआहे. जवळपास ६०० आरएसएस कार्यकर्त्यांना प्रणव मुखर्जी संबोधित करणार आहेत. आरएसएसच्या तिसऱ्या संघ शिक्षा वर्गासाठी संघाचे जवळपास ६०० कार्यकर्त्ये नागपूरच्या मुख्यालयात सहभागी होणार ओहत. या वर्गात भारताचे माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी मार्गदर्शन करतील असे आरएसएसकडून सांगण्यात आले आहे. याबाबत प्रणव मुखर्जी यांच्या कार्यालयाकडून याबाबत अजून कोणतीही माहिती देण्यात आलेली नाही. पण, आरएसएसच्या पदाधिकाऱ्यांनी प्रणव मुखर्जींनी हे आमंत्रण स्विकारले आहे असे सांगण्यात येत आहे.